30.8 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriमारुती मंदिर परिसरामध्ये बारमध्ये राडा, रागाच्या भरात पोटात बाटली खुपसली

मारुती मंदिर परिसरामध्ये बारमध्ये राडा, रागाच्या भरात पोटात बाटली खुपसली

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरामध्ये एका बारमध्ये शुक्रवारी रात्री दारू पिण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. दारूच्या नशेमध्ये एकमेकांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दारूच्या नशेत तर्रर असलेल्या एकाने संतापाने हातातील दारूची बाटली फोडून ती समोरच्याच्या पोटामध्ये खुपसली. अन्य एकाला सुद्धा किरकोळ जखम झाली आहे. यामध्ये दोघेसुद्ध जखमी झाले.

बारमध्ये असणारी गर्दी रोजचीच असून, अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने पोलिसांना पाचारण करण्यात आले. ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेंव्हा ज्याने बाटली खुपसली ती व्यक्ती स्वताहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली असून, ज्याला गंभीर दुखापत झाली आहे तो मात्र तेथून पळून गेला.

सदर प्रकारणाची अद्याप पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली नसून, पोलीस ज्याला भोसकण्यात आले त्याचा शोध घेत आहेत. रत्नागिरीमधील शासकीय रुग्णालय तथा सर्व खाजगी रुग्णालयामध्ये देखील शोध घेतला असता, तो कोणत्याही रुग्णालयात अद्याप दाखल झाला नसल्याचे समजते आहे. जो तरुण जखमी झाला, तो तिथून पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नक्की तो तरुण गेला कुठे? एवढा जखमी होऊन देखील तो कोणत्याच रुग्णालयात दाखल का झाला नाही? त्याने कुठे उपचार घेतले असतील का? पोलिसांना घाबरून हा तरुण कुठे लपून बसला असेल? अशी चर्चा सर्व रत्नागिरीमध्ये सुरु आहे. पोलिसांची सुद्धा शोधाशोध सुरु आहे. पोलिसांनी सध्या हमला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आणि त्याची सुद्धा कसून चौकशी सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular