20.9 C
Ratnagiri
Wednesday, January 7, 2026

मॅरेथॉन उपक्रमामध्ये मराठीचा वापर – प्रसाद देवस्थळी

कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या तिसऱ्या वर्षी मराठी भाषेचा...

कोंडगावची घंटागाडी सात महिने धूळ खात

कोंडगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेली घंटागाडी तब्बल सात...

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघसंवर्धनाला गती…

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे उद्या स्वीकारणार पदभार

रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे उद्या स्वीकारणार पदभार

यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत हे उपस्थित राहाणार आहेत.

रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे या सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आपला पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत हे उपस्थित राहाणार आहेत. दरम्यानं पदभार स्वीकारण्या आधीच त्यांनी जनसेवेचा श्रीगणेशा केला आहे. रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी आपल्या कामाचा धडाका निवडून आल्यापासूनच सुरू केला आहे. निवडणूक संपली असून आता केवळ विकासाचे राजकारण करायचे आहे, पदभार स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण होईलच, पण रत्नागिरीकरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणे हे माझे पहिले उद्दिष्ट असेल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सहसा पदभार स्वीकारल्यानंतर काम ाला सुरुवात करतात, मात्र शिल्पाताई सुर्वे यांनी विजयानंतर लगेचच सक्रिय होत रत्नागिरीच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसाठे, धरणे यांची त्यांनी पाहाणी केली. तसेच कचरा डेपोलाही भेट दिली. यावेळी नगरसेवक सौरभ मलुस्टे, पप्पू शेठ सुर्वे, नगरसेविका पूजा पवार, दीपक पवार हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular