26 C
Ratnagiri
Sunday, January 18, 2026

किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण...

रत्नागिरीत गुन्हेगारांवर आता ‘एआय’ ठेवणार नजर

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक...

समुद्रात मोठे वादळ, प्रतिकूल हवामानामुळे पुरेशी मासळी मिळेना

समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने...
HomeKhedखेडमध्ये आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध

खेडमध्ये आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध

बैठकीत खेड खाडीपट्ट्यामध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्हगत नुकत्याच नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. खेड शहरातील निवडणूक रणधुमाळी हळूहळू ओसरत असतानाच ग्रामीण भागात नव्या निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला असून जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. जिल्ह्यातील चार नगर पालिका आणि तीन नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून २१ डिसेंबरला मतमोजणी पार पडली. दरम्यान, निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता. कधीही लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

नगर पालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने समाधानकारक यश मिळवले असून त्यामध्ये सेनेचा प्रभाव अधिक जाणवला. या पार्श्वभूमीवर आगामी ग्रामीण निवडणुकांमध्ये कोणाचा वरचष्मा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर पालिका निवडणुका संपताच शहरातील राजकीय हालचाली आता गावागावात पोहोचताना दिसत असून प्रत्येक चौकात आणि बैठकीत खेड खाडीपट्ट्यामध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी ग्रामीण भागातील कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून राजकीय डावपेच आखले जात आहेत.

निवडणुका जवळ येताच अनेकांना अचानक जनतेची आठवण येते, हे नेहमीचे चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. दरम्यान, कायम लोकांसोबत राहणारे, अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणारे आणि विकासासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कार्यकत्यांनाच संधी मिळावी, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या गाजावाजाला न भुलता मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी भावना ग्रामीण भागात प्रकषनि ऐकू येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular