27.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeEntertainmentपरी झाली शेवटचा सीन शूट करताना भावूक, भावना इंस्टावर केल्या व्यक्त

परी झाली शेवटचा सीन शूट करताना भावूक, भावना इंस्टावर केल्या व्यक्त

आता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे यांच्यात जसे प्रेक्षक गुंतले होते, त्यापेक्षा जास्त ते छोट्या परीमध्ये गुंतले होते.

मायरा वायकुळ ही बाल कलाकार मराठी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत येण्या आधीपासून सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. तिचे आई-वडील तिचं इन्स्टा अकाऊंट चालवतात. याआधीही तिच्या रील्सना खूप पसंती मिळत होतीच. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आली असून, मायराने तिच्या भावना इन्स्टावर शेअर केल्या आहेत.

माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता संपणार, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. झी मराठीनं मालिका वर्षोनुवर्षे सुरु ठेवून त्या कंटाळवाण्या न करता अनेक मालिकांना ठराविक वेळेत निरोप दिला आहे. त्यात याही मालिकेचा समावेश केला गेला आहे. आता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे यांच्यात जसे प्रेक्षक गुंतले होते, त्यापेक्षा जास्त ते छोट्या परीमध्ये गुंतले होते. त्यामुळे मालिका संपणार म्हटल्यावर प्रेक्षक परीला म्हणजेच मायराला आणि तिच्या लडिवाळ बोलण्याला खूपच मिस करणार.

मायरा वायकुळ म्हणते, ‘माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा ‘परी’ म्हणून हा पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही कालच घडल्यासारखाच वाटतोय आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ आज येऊन ठेपली सुद्धा. खूप भावुक झालेय या क्षणाला. पण म्हणता म्हणता मधलं एक वर्ष कसे पार पडले ते कळलेच नाही;  याचे कारण म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि मालिकेतील सर्व कलाकारांनी व संपूर्ण टीमने ‘परी’ ला आणि अर्थातच मला म्हणजेच मायरा वायकुळला दिलेले अफाट प्रेम!’

ती पुढे लिहिते, ‘परीला तर प्रेक्षक वर्गाच्या सर्वच स्तरांतून भरभरून प्रेम मिळाले त्याबद्दल मी सर्वच रसिक प्रेक्षकांचे कायम ऋणी राहीन. आणि ‘परी’ ही गोड भूमिका मला साकारायची संधी दिल्याबद्दल एमटीआरच्या संपूर्ण तुमचे व झी मराठी वाहिनीचे मन: पूर्वक आभार! तुम्हा सर्वांचे माझ्यावरील प्रेम- आशीर्वाद असेच कायम राहो व माझ्याकडून यापुढे छान छान कलाकृती घडत राहो अशी बाप्पाचरणी मनोमन प्रार्थना. तुमचीच लाडकी, परी अर्थात मायरा वायकुळ.’

RELATED ARTICLES

Most Popular