26.4 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunचिपळूण-लोटेतील प्रदूषणा ची यंत्राद्वारे होणार तपासणी

चिपळूण-लोटेतील प्रदूषणा ची यंत्राद्वारे होणार तपासणी

लोटे एमआयडीसीतील उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत.

लोटे औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या वायू आणि जलप्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर घाणेखुंट सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोटे एमआयडीसीतील उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत. उद्योगांनी कंपनीत बसवलेली यंत्रणा योग्यप्रकारे कार्यरत आहे का, याची योग्य ती तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच लवकरच लोटे येथील वायूप्रदुषणाची यंत्रसामुग्रीद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोटे औद्योगिक वसाहततीमधील परिसरात हवेतील प्रदषूण आणि जलप्रदूषणदेखील वाढलेले आहे. या प्रदुषणाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही हत नसल्याने जनआंदोलन उभारण्याचा इशारा घाणेखुंटचे सरपंच संतोष ठसाळे यांनी दिला होता.

त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लोटेतील उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत. उद्योगातून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीत जी यंत्रणा बसवण्यात आली ती योग्य प्रकारे कार्यान्वित आहे की नाही, याचीही खातरजमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर लोटे औद्योगिक क्षेत्रात अचानक भेटी देऊन यंत्रसामुग्रीच्या साह्याने वायू प्रदूषणाची तपासणी केली जाणार असल्याचेही प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकांराशी बोलताना सांगितले. लोटे येथे हवा प्रदूषणाच्या मोजणीसाठी एअर मॉनिटरिंग सिस्टिम बसवण्यात आली; मात्र त्याची माहिती स्थानिकांना उपलब्ध झालेली नाही.

लोटे येथे काही ठराविक उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची ओरड आहे. संबंधित कंपन्यांची माहिती मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयास देण्यात आली; मात्र अद्याप त्यावर हालचाली झालेल्या नाहीत. राजकीय वरदहस्तामुळे संबंधित कंपन्यांना पाठीशी घातले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ३० वर्षापूर्वी एमआयडीसीतील कंपन्यांची संख्या अधिक होती. तुलनेत उद्योग कमी होत असताना नवीन उद्योगांची जास्त भर पडली नाही, तरीही प्रदूषण वाढल्याच्या तक्रारींमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत वायूप्रदूषण तपासणीचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular