22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriअमित शहा आणि उद्धव ठाकरेंची एकाच दिवशी रत्नागिरीत सभा?

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची एकाच दिवशी रत्नागिरीत सभा?

रत्नागिरीत रविवारी २ दिग्गजांच्या शाब्दीक तोफा धडाडणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता हळूहळू तापू लागला असून प्रचाराचा हा ज्वर येत्या रविवारी २८ एप्रिलला अधिक चढण्याची शक्यता आहे. कारण महायुतीच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच दिवशी रत्नागिरीत येत आहेत. त्यामुळे रत्नागिरीत रविवारी २ दिग्गजांच्या शाब्दीक तोफा धडाडणार असून या दोन्ही सभांकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यम ान खासदार विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत होत आहे.

दोन्ही बाजू तोडीस तोड असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे: महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास थोडा विलंब झाला. ठाकरेंनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा गेल्या महिन्यातच केली. त्यामुळे विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर होताच भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी-मनसे-आरपीआय या घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली दिसून येते. उमेदवार नारायण राणे यांनी तर मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्यांचे सर्व कुटुंबियदेखील प्रचारात उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसैनिकांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे.

खासदार राऊत यांची एक फेरी पूर्ण झाली असून दुसऱ्या फेरीत ते आता कार्यकर्त्यांचे जि.प.गटनिहाय मेळावे घेत आहेत. शेवटच्या टप्प्यात जाहीर सभा होईल, असे सांगण्यात आले होते. रविवारी उद्धव ठाकरेंची सभा ७ मेला या मतदारसंधात मतदान होणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा होतील, असा अंदाज होता. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रचारासाठी येणार आहेत. उद्धव

ठाकरे मे महिन्याच्याऐवजी याच महिन्यात येत्या रविवारी २८ एप्रिलला रत्नागिरीत सभा घेणार असल्याचे कळते. रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरातील जलतरण तलावानजिकच्या मैदानावर २८ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची सभा होईल, असे कळते. मात्र या माहितीला अद्यापही दुजोरा मिळू शकलेला नाही. २८ तारीख बहुदा निश्चित होईल, अशी माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात येते.

त्याच दिवशी अमित शहांची सभा – विशेष म्हणजे २८ एप्रिलला महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभादेखील रत्नागिरीत होणार असल्याचे वृत्त आहे. ही सभा २४ एप्रिलला होणार होती. मात्र शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली. आता ही सभा २८ एप्रिलला होईल, असे कळते. सकाळी गोव्यामधील सभा आटपून अमित शहा दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत सभा घेतील, अशी शक्यता आहे. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर कॉलेज किंवा प्रमोद महाजन क्रीडांगणावर ही सभा होण्याची शक्यता आहे.

२ दिग्गज एकाचदिवशी – देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिग्गज नेते एकाचदिवशी प्रचारासाठी रत्नागिरीत येणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षांच्यावतीने रविवारी सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अधिकृतपणे अजूनही दोन्ही पक्षांकडून माहिती देण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular