25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक, वेळापत्रक बदलले

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक, वेळापत्रक बदलले

कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२:२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण मार्गावर मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात येत आहे. वीर ते खेड विभागादरम्यान दुपारी १२:२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३:२० वाजता संपणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे ६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच ६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची तिरुअनंतपुरम- निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यांत येणार आहे. ७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची तिरुअनंतपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular