27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeDapoliदापोलीत पारा ९.६ अंशावर थंडीचा कडाका

दापोलीत पारा ९.६ अंशावर थंडीचा कडाका

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचे प्रमाण वाढत आहे.

दापोलीतील पारा पुन्हा एकदा खाली आला असून, बुधवारी (ता. २४) किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. आठवडाभरात दुसऱ्यावेळी दहा अंशाखाली पारा घसरला आहे. त्यामुळे दापोली तालुक्यात थंडीचे वातावरण आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर किमान तापमानाची नोंद झाली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात एक-दोन दिवसच थंडी होती. त्यानंतर थंडी गायब झाली. मागील दोन आठवड्यापूर्वी ढगाळ वातावरणं आणि अवकाळी पाऊस पडून गेला. त्यानंतर वातावरणात बदल झाला आणि थंडीची लाट सुरू झाली.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचे प्रमाण वाढत आहे. याच महिन्यात १६ जानेवारीलादेखील ९.४ अंश सेल्सिअस नोंद झाली होती. त्यानंतरही १० ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा होता. थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजार पसरत आहेत. रात्री, सकाळी दापोली शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. दिवसाही थंडी जाणवत आहे. सकाळी फिरायला बाहेर पडणारे नागरिकही गरम कपडे परिधान करून दिसतात.

सकाळी नऊ वाजेपर्यंत गारवा जाणवतो. गेले आठवडाभर पारा वर-खाली होत असल्यामुळे वातावरणातील चित्र बदलले आहे. थंडगार वातावरणामुळे तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. २६ जानेवारीला सुट्टी त्यानंतर पुढे शनिवार, रविवार जोडून सुट्टया असल्यामुळे दापोलीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण, किनारपट्टी परिसरातील बहुतांशी रिसॉर्ट आधीच बुक झाले असल्याचे येथील रिसॉर्ट मालकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular