27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplun'वंदे भारत' चिपळूणला थांबविण्याचा प्रस्ताव

‘वंदे भारत’ चिपळूणला थांबविण्याचा प्रस्ताव

२६ जानेवारीला चिपळूण रेल्वेस्थानकावर सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा मुकादम यांनी दिला.

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला चिपळूण थांबा देण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे पाठविण्यासह चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करणे, कळबंस्ते रेल्वेफाटकाजवळ उड्डाणपूल उभारणे यासाठी ४० कोटींचे फेरअंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने बैठकीत दिली. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोन महिन्यांचा अवधी मागितल्यामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी प्रजासत्ताकदिनी पुकारलेले रेलरोको आंदोलन स्थगित केले.

रेल्वे संदर्भातील विविध मागण्यांसाठी २६ जानेवारीला चिपळूण रेल्वेस्थानकावर सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा मुकादम यांनी दिल्याने मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या दालनात कोकण रेल्वे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, अन्याय निवारण समिती सदस्य यांची बैठक झाली. त्या बैठकीत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष मुकादम यांनी कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपूल उभारणे, वंदे भारतसह लांब पल्ल्याच्या आठ गाड्यांना चिपळूणमध्ये थांबा मिळावा, चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करणे, चिपळूण-कराड ऑनलाईन भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाला प्रारंभ करणे, आदी मागण्या मांडल्या.

त्यावर बैठकीत दीड तास चर्चा झाली. या विविध मागण्यांसंदर्भात कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देत तसे पत्रही सादर केले. वंदे भारत व अन्य लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात येईल. तसे पत्र रेल्वे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. कळंबस्ते येथील रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे नव्याने करण्यात आलेले फेरअंदाजपत्रक ४० कोटींचे झालेले असून, राज्य सरकारकडून त्याबाबत शंभर टक्के निधी उपलब्ध झाल्यास ठेव मुदत बांधकाम केले जाईल. चिपळूण- दादर पॅसेंजर गाडीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याबाबत बेलापूर मुख्य कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला जाईल.

त्याचबरोबर चिपळूण- कराड प्रस्तावित मार्गाच्या कामाची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला रवींद्र शिंदे, आर. बी. पाटील, पवन जोशी, संजय वस्त, नवाबसिंग, डी. वाय. पवार, स्नेहल मेहता, एस. एस. बर्वे, जे. पी शुक्ला, गजानन महाडिक, रूपेश इंगवले, संजय जाधव, दशरथ जाधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular