27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriपुढच्या वर्षी लवकर या! आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पांना प्रेमाचा निरोप

पुढच्या वर्षी लवकर या! आग्रहाचे निमंत्रण देत बाप्पांना प्रेमाचा निरोप

रत्नागिरी शहर परिसरातील मूर्तीचे मांडवी किनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले.

‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आग्रहाचे निमंत्रण देत आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्यात आला. रत्नागिरी शहरात म ांडवी किनारपट्टी तसेच पांढरा समुद्र, भाट्ये येथे रात्री १० वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन सोहळ्यानंतर आता १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. गेले १० दिवस रत्नागिरीत गणेशोत्सव प्रचंड उत्साहात साजरा केला गेला. दीड दिवस, ५ दिवस, ७ दिवसाचे गणेशोत्सव पार पडल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्यादिवशी १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.

दुपारी ३ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. रात्री १० वाजेपर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता. यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त आलेले नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा गर्जना करत ढोल, ताशे, बेंजो, डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. रत्नागिरी शहर परिसरातील मूर्तीचे मांडवी किनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले. तर काही मूर्तीचे भाट्ये किनाऱ्यावर तसेच पांढरा समुद्रावरही विसर्जन करण्यात आले. नाचणे परिसरातील मूर्तीचे तळ्यात विसर्जन झाले. तसेच रत्नागिरी तालुक्यात गावागावातही विसर्जन सोहळे पार पडले.

RELATED ARTICLES

Most Popular