25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRajapurमतांची जुळवाजुळव करायला आलेल्या रिफायनरी समर्थकाला लावले पिटाळून

मतांची जुळवाजुळव करायला आलेल्या रिफायनरी समर्थकाला लावले पिटाळून

व्यवसायात मदत करण्याचे आस्वासन दिल्याची चर्चा सुरु आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात घरगुती गणपतींच दर्शन घेण्याचा धडाका इच्छुक उमेदवारानी लावला होता. बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त करून मतांची बेगमी करण्यासाठी शिवणे गावात गेलेल्या तालुकास्तरीय नेत्याला रिफायनरी विरोधकांनी पिटाळून लावल्याची चर्चा बारसु पंचक्रोशीत सुरु आहे. गेली तीन वर्ष बारसु परिसरात रिफायनरी विरोधी वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर रिफायनरी विरोधकांना गोंजरण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून सुरु आहेत.

एका इच्छुक उमेदवाराने रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या नेत्याला जवळ करून त्याच्या व्यवसायात मदत करण्याचे आस्वासन दिल्याची चर्चा सुरु आहे. राजापूर विधानसभा मतदार संघातून इच्छुक असलेल्या उमेदवाराचा खंदा समर्थक असलेल्या तालुकास्तरीय नेत्याने बारसु परिसरातील शिवणे गावात बाप्पाच्या दर्शनाची तारीख ठरवली. त्याचे नियोजन संघटनेच्या नेत्याने केले होते. तालुकास्तरीय नेता गावात येणार असल्याची कुणकुण काही लोकांना लागली होती. त्याचा रोखण्यासाठी जय्यत तयारी केली. मात्र, त्या दिवशी तो नेता आलाच नाही. एक दिवस रात्री ९ च्या दरम्यान तालुकास्तरीय नेता आरतीच्या वेळी संघटनेच्या नेत्याच्या घरी गेला.

संघटनेच्या नेत्याला सोबत घेऊन गावकराच्या घरी जाण्याची तयारी केली. दरम्यान, ही खबर एका आक्रमक आंदोलकाला समजताच त्याने त्यांचा पाठलग केला आणि त्या नेत्याला जाब विचारला. चार वर्ष आमच्या गावात गणपतीच्या दर्शनाला कधी आलात नाही आणि आता कसे काय? तेव्हा त्या नेत्यांची बोबडी वळली. यापुढे आमच्या गावात येऊ नका असा सज्जड दम भरल्या नंतर तो नेता आपल्या गाडीत बसून पळून गेला. याची चर्चा बारसु पंचक्रोशीत सध्या सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular