23.4 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRatnagiriना. उदय सामंत रत्नागिरीत भाजपकडून लढणार आणि त्यांना आम्ही पाडणारः आ. राजन साळवी

ना. उदय सामंत रत्नागिरीत भाजपकडून लढणार आणि त्यांना आम्ही पाडणारः आ. राजन साळवी

पालकमंत्रीपदाचा गैरवापर करत असल्याची गंभीर टिकाही आमदार राजन साळवी यानी केली आहे.

येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पालकमंत्री ना. उदय सामंत हे रत्नागिरीतून भाजपाचे उमेदव- ार असतील असा कयास उबाठा शिवसेनेचे उपनेते आ. राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीत पालकमंत्री ना. उदय सामंत यांना रत्नागिरीतून आम्ही पाडण्याचा संकल्प केला आहे. तो आम्ही पूर्ण करणारच.. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमवारी राजापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार साळवी यांनी दिला आहे. पालकमंत्री म्हणून उदय सामंत हे जिल्हा नियोजनमधील निधी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांवर अन्याय करुन फक्त राजापूर विधानसभा मतदारसंघात खिरापतीसारखा वाटत असल्याची टिका आमदार राजन साळवी यानी केली आहे.

पालकमंत्री उदय सामंत हे निवडणुकींवर डोळा ठेवून जिल्हा नियोजनच्या ३०० कोटीच्या निधीपैकी २५० कोटी रुपये फक्त राजापूर विधानसभा मतदार संघात देत आहेत. या निधीचा विनियोग तपासा, यावरुन ते पालकमंत्रीपदाचा गैरवापर करत असल्याची गंभीर टिकाही आमदार राजन साळवी यानी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसहीत शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आमदार म्हणून राजापूर, लांजा व (साखरपा) संगमेश्वर या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याना आपण विभागवार बैठका लावण्यासाठी पत्र दिले होते. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या दबावापोटी त्या घेऊ दिल्या नसल्याचा गौप्यस्फोट आमदार राजन साळवी यानी केला.

या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राजन साळवी यानी रत्नसिंधु समितीचे सदस्य किरण सामंत यानी केळवली येथे केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजापूरात होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले असून त्याचे पूर्ण श्रेय हे आपलेच आहे असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular