30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...

दापोलीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले...

मिरकरवाडा जेटीवर मतदानामुळे शुकशुकाट – मच्छीमारांची सुटी

शहरात तसेच नजीकच्या परिसरात लोकशाही महोत्सवात मतदान...
HomeRatnagiriमिऱ्या बंधाऱ्याच्या कामामध्ये कोणताही भ्रष्टाचार न होण्याची ग्वाही – पालकमंत्री

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामामध्ये कोणताही भ्रष्टाचार न होण्याची ग्वाही – पालकमंत्री

दरवर्षी थोडा-थोडा करून सुमारे एक किमी किनारा समुद्र गिळंकृत करत चालला आहे.

मिऱ्या बंधाऱ्याचे काम मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर सुरु करण्यात येणार असल्याचे ठेकेदाराने सांगितले होते.  सुमारे साडेतीन किमीचा हा बंधारा असून त्यामुळे मिऱ्या गावांचे संरक्षण होणार आहे. तसेच पर्यटनालाही चांगली संधी उपलब्ध होणार आहे. मात्र भूमिपूजन होऊन वर्ष उजाडले तरी, ठेकेदाराने काम सुरू करण्यास विलंबच केला.  समुद्राच्या उधाणामुळे मिऱ्या किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप झाली. दरवर्षी थोडा-थोडा करून सुमारे एक किमी किनारा समुद्र गिळंकृत करत चालला आहे.

आणि प्रत्येक पावसात तर समुद्र आता थेट मानवी वस्तीत शिरू लागला आहे. तेथील रहिवाशांच्या बागा, शेड समुद्राने गिळंकृत केले आहे. रहिवाशांच्या सात-बारावर समुद्र आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि उधाणाच्या भरती वेळी जीव मुठीत घेऊन रहिवाशांना राहावे लागते. समुद्राचे पाणी कधीही घरात शिरण्याची भिती असते. स्थानिकांनी पक्का बंधारा व्हावा, यासाठी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, तेव्हा त्याची दखल शासनाने घेतली. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे शासनाने मिऱ्या बंधाऱ्याला १६० कोटी रुपये मंजूर केले गेले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाचे भुमिपूजन केले. परंतु काम सुरू होण्यास मात्र अजून मुहूर्त सापडतच नाही आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी या सर्व कामाकडे संपूर्ण लक्ष असून, मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधारा हा आराखड्याप्रमाणेच होईल. त्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह हे स्वतः लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी बंधाऱ्याची पाहणी केली. ठेकेदार कंपनीला स्थानिक ग्रामस्थांना आराखडा दाखविण्याच्या सूचना केल्या आहेत. एकूणच या कामामध्ये कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहेत. बंधाऱ्याचे दर्जेदार काम करण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला दिले आहेत, अशी माहिती दिली.

पत्तन विभागाने ठेकेदार कंपनीला समज देत दोनवेळा दंडात्मक कारवाई केली. समज दिल्यानंतर ठेकेदार कंपनीने कामाला सुरवात केली. परंतु हे काम आराखड्याप्रमाने नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच कंपनीने प्रेझेंटेशनही दाखवलेले नाही. म्हणून ९ डिसेंबरला स्थानिक ग्रामस्थ पालकमंत्री उदय सामंत यांना भेटले. सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह बंधाऱ्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांना आश्वस्थ केले.

RELATED ARTICLES

Most Popular