रत्नागिरी शहराजवळच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पावसाळा जवळपास संपला तरी सुरु न झाल्याने मिऱ्यावासियांवरील नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या कामासाठी जी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली होती त्या मोनार्च कंन्सर्टन या कंपनीलासुद्धा वर्षभराच्या कामाचे पैसे शासनाकडून देण्यात आले नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अधिक वृत्त असे की, मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम १६० कोटी रुपये खर्चाचे आहे. साडे तीन किलोमीटर लांबीचा बंधारा बांधण्यात येतो आहे. संबंधित ठेकेदाराला त्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र वेळेवर काम सुरु न झाल्याने ही मुदत ८ नोव्हेंबर २०२३ ला संपली.
अजून एक ते दिड किलोमीटरचे काम बाकी आहे. मिऱ्या बंधाऱ्याचे काम चांगल्यापद्धतीने व्हावे आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मिऱ्याचे ग्रामस्थ प्रत्येकाल सहकार्य करत असतात. कामावर त्यांचे लक्षही असते. ते सतर्क असतात. पावसाळा संपला आहे तरी देखील ठेकेदारांने पुन्हा काम सुरु न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याचे आदेश ठेकेदाराला दिल्याचे उपअभियंता साळुंखे यांनी सांगितले. काम पुर्ण करण्यास मुदतवाढ देवून १० महिने झाले. मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सल्लागार कंपनीला पैसे मिळाले नसल्याचा दावा केला जात आहे. एकंदरीत मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम नेमके कधी मार्गी लागणार याविषयी शंका व्यक्त होत आहेत.