28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriअखेर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला मुहूर्त गवसला

अखेर मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला मुहूर्त गवसला

१० महिन्यामध्ये मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डिसेंबर २०२१ ला धामधुमीत पायाभरणी केलेल्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला अखेर अंदाजे वर्षभरानंतर मुहूर्त मिळाला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून हे काम रखडले होते. पत्तन विभागाचा पाठपुरावा आणि स्थानिकांनी केलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. ठेकेदाराने काम सुरू केले आहे. कामामध्ये दिरंगाई केल्या बद्दल पत्तन विभागाने दोनवेळा या ठेकेदाराला लाखो रुपयांचा दंड देखील केला आहे. त्यामुळे आता हे काम वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर मिऱ्या बंधाऱ्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदाराकडून देण्यात आली आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये गावकर्यांना समुद्राच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तेथील गावांचे संरक्षण आणि पर्यटन या उद्देशाने या बंधाऱ्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम झाले नाही. ठेकेदाराने केवळ दगड आणून किनाऱ्यावर टाकले होते. १० महिन्यामध्ये मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काहीच काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्यासाठी पत्तन विभाग सातत्याने पाठपुरावा करत होता.

त्यानंतर पत्तन विभागाने ठेकेदार कंपनीत डीव्हीपी इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. ला कामात दिरंगाई केल्याबद्दल पहिल्यांदा १८ लाख ८० हजाराचा दंड केला. त्यानंतर देखील काम सुरू न केल्याने पत्तन विभागाने दुसऱ्यांदा कंपनीला १८ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला. एकूण ३६ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर ठेकेदार कामाकडे दुर्लक्ष करत होता. अखेर आप्पा वांदकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी बंधाऱ्याचे काम सुरू व्हावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. तेव्हा पत्तन विभागाने लेखी स्वरूपात आठ ते दहा दिवसांमध्ये काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular