26.2 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeChiplunदिवाळी सणाच्या शुभारंभी आ. शेखर निकम अर्ज भरणार

दिवाळी सणाच्या शुभारंभी आ. शेखर निकम अर्ज भरणार

विजयाचा विश्वास मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसूबारसेच्यादिनी २८ ऑक्टोबरला चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार शेखर निकम हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या पाच वर्षात लोकांची केलेली कामे, लोकांशी ठेवलेला सततचा संपर्क, विकासकामे तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेची भक्कम पाठींबा या सगळ्यांच्या जोरावर या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. आदिती देशपांडे, माजी सभापती सौ. पूजा निकम माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निकम यांनी सांगितले की, महायुतीतर्फे सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी १०.३० वाजता महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता या सर्वांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, म ाजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाई (आठवले गट) तालुकाध्यक्ष, महिला आघाडी तालुकाध्यक्षा, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. प्रांत कार्यालयापर्यंत रॅलीने जाऊन महायुतीचे नेते पदाधिकारी यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती आ. शेखर निकम यांनी यावेळी दिली.

विजयाचा विश्वास मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जनसंपर्क, लोकांची केलेली कामे, महापूर काळात केलेली कामे या सगळ्यांच्या जोरावर या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला. महायुतीची एकजूट मजबूत असून कोणीही नाराज वगैरे नाही. महायुतीतील पक्ष आणि नेते व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभागी होती असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular