25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरीतील आमदार ठाकरे शिवसेनेचाच - कार्यकर्त्यांचा विश्वास

रत्नागिरीतील आमदार ठाकरे शिवसेनेचाच – कार्यकर्त्यांचा विश्वास

शिवसेनेतील इच्छुक तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उदय बने, सुदर्शन तोडणकर या तिघांनी व्यक्त केला

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून पक्षनेतृत्वाने कोणालाही उमेदवारी दिली तरीही त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. आगामी निवडणुकीत रत्नागिरीतील आमदार ठाकरे शिवसेनेचाच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास ठाकरे शिवसेनेतील इच्छुक तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उदय बने, सुदर्शन तोडणकर या तिघांनी व्यक्त केला. नाचणे जिल्हा परिषद गटातून आज ठाकरे शिवसेनेच्या भगव्या सप्ताहाला सुरवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग नाचणे येथून फुंकले.

या प्रसंगी ठाकरे सेनेतील तिन्ही प्रमुख दावेदार या बैठकीला एकाच मंचावर उपस्थित होते. त्याच्यासह जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, उपजिल्हासंघटक ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावणंग, तालुका सचिव संदीप सुर्वे, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व शाखाप्रमुख, गटप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला हजेरी लावली. या प्रसंगी साळवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. यावरून पक्षाची ताकद स्थिर असल्याचे विरोधकांनी पाहिले आहे.

त्यामुळे सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे. पक्षात इच्छुकांमध्ये वेगवेगळी नावे आहेत; पण पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्यासाठी ताकद पणाला लावली जाईल. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने म्हणाले, सध्या विरोधकांकडून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत; मात्र निवडणुका आल्या की, अशा अफवांचे पेव फुटते. तळागाळात शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे निवडणुकीत यश निश्चित आहे.

RELATED ARTICLES

Most Popular