28.9 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील मत्स्य उत्पादनात यावर्षी सर्वाधिक म्हणजेच ४७...

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...
HomeKokanमनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा महासंपर्क कोकण दौरा

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा महासंपर्क कोकण दौरा

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौरा असणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौरा असणार आहे. चिपळूण मधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे असणार आहे. सर्वप्रथम सकाळी १०:०० वाजता रत्नागिरी चिपळूण नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ते हार अर्पण करतील. व चिपळूण नगरपरिषद ते बहादूर चेक नाका येथे पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी १०:४० वाजण्याच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ते पुष्पहार अर्पण करतील.

सकाळी ११:०० वाजता डी. बी. जे कॉलेज चिपळूण येथे म.न.वी. से युनिट उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी ११:३० वाजता हॉटेल अभिरुची हॉल येथे संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तालुक्यातील म.न.वी. से पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर १२:३० वाजता ते खेड कडे प्रस्थान करतील. दुपारी १:०० वाजता खेड भरणे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. दु. ०१:१५ वा.. म.न.वी. से पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कडून स्वागत व खेडकडून दापोलीकडे प्रस्थान करतील. दुपारी २:०० वाजता दापोली येथे दुपारचे जेवण करून दुपारी २:३० वाजता एस टी स्टॅन्ड दापोली येथे त्यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून भव्य स्वागत असणार आहे.

म.न.वी.से. च्या पदाधिकाऱ्यांची दुपारी ३:०० वाजता फाटक कॅपिटल हॉल दापोली येथे खेड, दापोली व मंडणगड बैठक होणार आहे. सायंकाळी ५:०० वाजता कोकण कृषी विद्यापीठ पाहणी व विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता दापोलीकडून महाडकडे प्रस्थान करतील. असा अमित ठाकरे यांचा पूर्ण १ दिवसीय महासंपर्क दौऱ्याचा कार्यक्रम असणार आहे.

खेड माजी नगराध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यानी दुपारी ३:०० वाजता फाटक कॅपिटल हॉल दापोली येथे होणाऱ्या खेड, दापोली व मंडणगड म.न.वी.से. च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्व पदाधिकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular