27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiri'मनसे' तालुकाध्यक्षांना मारहाण - दोघांवर गुन्हा

‘मनसे’ तालुकाध्यक्षांना मारहाण – दोघांवर गुन्हा

अचानक पाठीमागून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांना काल कार्यालयातच बेदम मारहाण झाली. पक्षांतर्गत वादातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री मनसेच्या कार्यालयात हा प्रकार घडला. फिर्यादी रुपेश जाधव हे गोडबोले स्टॉप येथील आपले इलेक्ट्रिकचे दुकान बंद करून ऑफिस समोर लावलेल्या चारचाकी गाडीचा दरवाजा उघडत होते. या दरम्यान अचानक पाठीमागून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संशयित सूर्यकांत उर्फ रुपेश चव्हाण आणि राहुल खेडेकर या दोघांनी रुपेश जाधव यांच्यावर हल्ला चढवला.

राहुल खेडेकर याने रुपेश जाधव यांना धरून ठेवले तर सूर्यकांत चव्हाण याने रुपेश जाधव यांना दांडक्याने मारहाण केली. रुपेश जाधव यांच्या पायावर दांडक्याने चार-पाच फटके मारल्याने ते रस्त्यावर कोसळले. यानंतर चव्हाण याने जाधव यांच्या डोक्यात, हातावर, पाठीवर, पोटावर मारहाण केली. दुसरा संशयित राहुल खेडेकर याने लाथांनी जाधव यांना मारहाण केली. रुपेश जाधव यांना मारहाण करतानाचे शुटिंग करण्यात आले. रुपेश जाधव यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सूर्यकांत उर्फ रुपेश चव्हाण (रा. करवांचीवाडी) आणि राहुल खेडेकर (रा. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल आला आहे. पोलिस संशयितांच्या शोध आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular