26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanसुक्या मच्छीचे दर देखील गगनाला भिडले

सुक्या मच्छीचे दर देखील गगनाला भिडले

एकीकडे ताज्या मासळीची किंमत देखील महाग होत असताना सुकी मासळीदेखील महाग झाल्याने खवय्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागत आहे.

कोकणात सध्या मासेमारी हंगामाचा शेवटचा टप्पा सुरु असून, ग्राहक जास्तीत जास्त सुखी मच्छीचा साठ करून ठेवताना दिसत आहेत. पावसाळ्याच्या हंगामासाठी घाऊक प्रमाणात सुकी मासळी विकत घेण्यास झुंबड उडताना दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये मच्छिमारी बंद असल्यामुळे, मासळी खाण्याची आवड असणारे सुकी मासळी विकत घेऊन ती पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी साठवून ठेवतात. यंदा मात्र या सुक्या मासळीचे दरही गगनाला भिडले आहेत.

बहुतांश मच्छी विक्रेते शृंगारतळी आठवडा बाजारात विक्रीस बसत असून, काही मच्छी विक्रेते गावोगावी वाडीवस्तीवर फिरून विक्री करीत आहेत. सुकी मासळी जरी महाग असली तरीही ती विकत घेताना लोक दिसून येत आहेत. यामध्ये सुका कोलीम २५०  रुपये किलो, बले ४०० रुपये किलो तर काड सुमारे ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. सुके बोंबील ५०० ते ६०० रुपये तर सोललेली कोलंबी म्हणजेच सोडे ९०० रुपये किलोने विकली जात आहे.

यासोबतच सुकवलेली सुरमईसुद्धा ८०० ते १०००  रुपयांना आणि खारे बांगडे १०० रुपयांना ५ ते ८ विकले जात आहेत. महागाई सर्वच बाबींमध्ये वाढत असल्याने सुकी मासळी देखील आता चढ्या भावाने विकली जात आहे. मात्र, असे असतानाही सुकी मासळी आवडीने खाणारे खवय्ये मात्र ती आवर्जून विकत घेताना दिसून येत आहेत.

एकीकडे ताज्या मासळीची किंमत देखील महाग होत असताना सुकी मासळीदेखील महाग झाल्याने खवय्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात ताजे फडफडीत मासे मिळत नसल्याने, कोकणामध्ये सुकी मासळीवर ताव मारला जातो. विशेष करून कोकणात येणारे पुणे, मुंबईकर चाकरमानी आणि पर्यटक देखील सुकी मासळी विकत घेताना दिसतात.

RELATED ARTICLES

Most Popular