27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...
HomeRatnagiriजांभेकर विद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सकडून भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता

जांभेकर विद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सकडून भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता

कोकणातील समुद्राचे सौंदर्य कायम राखण्यात डीजी एन सी सी विभागाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

कोकणामध्ये अनेक पर्यटक सुट्ट्या घालवण्यासाठी येत असतात. कोकणातील मुख्य आकर्षण म्हणजे येथील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, निळाशार समुद्र आणि पर्यटन स्थळे. कोकणामध्ये असणाऱ्या स्वच्छतेमुळे वारंवार पर्यटक प्रत्येक सुट्टीला कोकणात दाखल होतात. रत्नागिरी मधील अनेक शाळा आणि कार्यालयांच्या अंतर्गत देखील समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली जात असते.

पर्यटकांची संख्या जास्त असल्याने त्यामुळे कचरा देखील किनार्यांवर मोठ्या प्रमाणात जमा होतो. डी.जी.एन.सी.सी.विभागाच्या सिंगल युज प्लास्टिक निर्मूलन मोहीम अंतर्गत जांभेकर विद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सनी समुद्र किनारा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. भाट्ये समुद्र किनारी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावर मोठा कचरा टाकला जातोय. या कचऱ्यात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. त्यामुळे समुद्रकिनारे अस्वच्छ आणि घाण दिसतात. कोकणातील समुद्राचे सौंदर्य कायम राखण्यात डीजी एन सी सी विभागाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

यावेळी भाट्ये समुद्र किनारी एनसीसी कॅडेट्सना स्वच्छते विषयी जिल्हाधिकारी बी एन पाटील व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. एन.सी.सी.फर्स्ट ऑफिसर स्नेहल पावरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामुळे शाळे मधील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी मिळून सर्व किनार्याची स्वच्छता केली.

पाणी, शीत पेय यांच्या प्लास्टिक बाटल्यांचा समावेश या कचर्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता. पर्यटकांनी वन टाईम युझ प्लास्टिकचा वापर जास्त केल्याने या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच जमला होता. जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील विद्यार्थ्यांसोबत काम आणि मार्गदर्शन करून विद्यार्थ्याना साथ दिली.

RELATED ARTICLES

Most Popular