ऐन मार्चमध्येच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या राज्याला दिलासा देणारी बातमी आली आहे. स्कायमेटने यंदाच्या पावसाचा अल निनोचा प्रभाव ओसरू लागला असून त्याची जागा आता निनो घेणार आहे. याचा फायदा भारतीय उपखंडाला होणार असून मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. परंतु काही काळ अल निनोच्या एक्झिटचा परिणाम मान्सूच्या आगमनावर जाणवणार असल्याचेही म्हटले आहे. निनोमुळे देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटचे एमडी जतीन सिंग यांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या पावसाळ्याचा दुसरा टप्पा चांगला जाणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये थोडी वाट पहावी लागू शकते असा अंदाज स्कायमेटचा आहे. असे असले तरी उत्तर, दक्षिण, आणि पश्चिमेकडील भागात पुरेसा चांगला पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा पाऊस कोसळणार असल्याचा वर्तविण्यात आला आहे. अंदाज बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या काळात कमी पावसाचा धोका आहे.
ईशान्य भारतात हंगामाच्या पहिल्या टप्प्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अल निनो वरून ला निनामध्ये रुपांतरीत होताना हंगामाची सुरुवात विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किर्ती कोसळणार… जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीच्या १०२ टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. अल निनोच्या जाण्याच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन काहीसे लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर आयएमडीने उष्णतेच्या लाटांचे दिवस ८ ऐवजी १० केल्याने पुढील काही माहिने उष्णतेच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.