27 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeMaharashtraमुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट निघेलः अजितदादांचाच टोला

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट निघेलः अजितदादांचाच टोला

गेली १२ वर्षे हा रस्ता रखडला आहे. 

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याची कबुली देत त्यावर एखादा बाँबे टू गोवा सारखा चित्रपट निघेल किंवा त एक पुस्तक निघेल अशी परिस्थिती आहे असे खोचक उदगार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत काढले. पवार यांनी असं म्हटल्यावर मात्र सरकार मधल्या मंत्र्याने असं वक्तव्य करणे, हा कोकणी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता ऐकायला मिळत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थ संकल्पावर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, कित्येक आमदार, खासदार झाल्यावर हा रस्ता पूर्ण करू म्हणून सांगितले होते. पण रस्ता काही झाला नाही. पण गडकरी यांनी हे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, अशी पुस्तीही जोडली. तसेच त्यावर एखादा बाँबे टू गोवा सारखा चित्रपट निघेल किंवा एक पुस्तक निघेल अशी परिस्थिती आहे असे उदगार पवार यांनी विधान सभेत काढले. गेली १२ वर्षे हा रस्ता रखडला आहे.

त्यात बरेच अपघात होऊन प्रवाशी मृत्यू पावले आहेत. लोकांच्या जीविताशी होत असलेल्या प्रकारावर एखादा मंत्री त्या विषयावर गंभीर हवा. त्याने पुढे होऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करायला हवेत. आणि. विषय मार्गी लावायला हवा. पण काहीतरी खोचक बोलणे म्हणजे कोकणी माणसांचा जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular