23.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriदाभोळे घाटात मोठी दरड कोसळली वाहतूक ठप्प

दाभोळे घाटात मोठी दरड कोसळली वाहतूक ठप्प

दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील यंत्रसामग्रीने (जेसीबी) दरड बाजूला करण्यात आली आहे. दरड बाजूला करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूकडील वाहतुक सुरळीत सुरू झाली आहे. शनिवारी दुपारी ४.१५ च्या सुम ारास दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र प्रसंगावधान जाणून महामार्गावरील कामगाराने तात्काळ जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाभोळे महामार्ग मृत्युंजय दूध ग्रुपचे प्रतिनिधी दीपक कांबळे, काका हिरवे आणि रविंद्र सुकम यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहतुकीचे नियमन केले. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान महामार्गावर चिखल मिश्रित पाणी जोरदार वाहत असल्याने दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय येत होता.

RELATED ARTICLES

Most Popular