25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeMaharashtraएकाच दिवशी असणाऱ्या एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षेवर सरकार काढणार तोडगा

एकाच दिवशी असणाऱ्या एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षेवर सरकार काढणार तोडगा

२१ ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती.

कोरोना काळापासून अनेक शासकीय परीक्षांच्या नियोजनाचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. दोन ते तीन परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळी नियोजित असल्याने, अनेक परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावे लागत आहे. त्यामुळे काही वेळा कोणतीतरी एक परीक्षा रद्द करण्यात आल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे, एका परीक्षेच्या फि चे पैसे देखील फुकट जाण्याची धास्ती परीक्षार्थींना लागली आहे.

यंदा सुद्धा एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. २१ ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा २१  ऑगस्टपासून तीन दिवस आहे. यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. एका परीक्षेला मुकावं लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम परीक्षार्थींच्या मनात निर्माण झाला होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचं नवीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular