पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी म्हटले जाते. हा महामार्ग यावर्षी पूर्णत्वाला जावो, असे साकडे आपण गणरायाला घातले आहे. त्याच्या आशीर्वादाने मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास जाणार आहे, असा विश्वास गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाला मुंबईकर चांगल्या रस्त्याने गावाकडे येईल, असेही त्यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, ना. योगेश कदम यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यम ांशी संवाद साधला.. ना. योगेश कदम म्हणाले की, आज राज्यात व देशात हिंदुत्ववादी सरकार आहे. देशावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गणराय शक्ती देवो, अशी प्रार्थना आपण गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असून, शेतकरी सुखाने नांदावा, त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर व्हावीत, समृद्धी नांदावी, अशी बाप्पाकडे प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले. ना. योगेश कदम म्हणाले की, अनेक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग यावर्षी पूर्णत्वाला जावो, असे साकडे आपण गणरायाला घातले आहे. हा मार्ग निश्चितच यावर्षी पूर्ण होऊन पुढच्या वर्षी मुंबईकर खड्डेमुक्त महामार्गावरून गावी येतील, असे त्यांनी सांगितले. आपल्या जबाबदाऱ्यांवर जबाबदारी पार बोलताना ते म्हणाले, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर सोपवलेली पाडताना कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न समर्थपणे हाताळता यावेत, यासाठीही गणरायाकडे प्रार्थना केली आहे.