24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriआखातात यंदा हापूस बॅन होईल की काय अशी भीती !

आखातात यंदा हापूस बॅन होईल की काय अशी भीती !

फळमाशी हा सर्वात मोठा शत्रू असून त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तरआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा हापूसवर बहिष्कार टाकण्याची भिती निर्माण होत आहे.

थंडी पडू लागल्याने हळूहळू आंब्याचा हंगाम वाढीस लागायला सुरुवात होत आहे. थंडीचे वातावरण आंब्याला मोहोर फुटायला पोषक असल्याने या हंगामात झाडांची विशेष काळजी घेतली जाते. पण आंबा पिकांवर इतर देखील संकटे उभी आहेत. फळमाशी, तुडतुडे, थ्रीप्स, बुरशी, मिनीबग इत्यादी संकटे ही आंब्याच्या मोसमासोबतच येतात. त्यातील फळमाशी हा सर्वात मोठा शत्रू असून त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तरआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा हापूसवर बहिष्कार टाकण्याची भिती निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलने गरजेचे आहे. असे वक्तव्य मुंबईतील आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी देवगड येथे झालेल्या आंबा बागायतदारांच्या मेळाव्यात केले.

सोबतच शेतक-यांसाठी पायाभूत सुविधा तसेच पॅकिंग, ग्रेडिंग, सॉर्टीग या बाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले. फळमाशी विरोधात विविध उपाय योजनांबद्दल विद्याधर जोशी, माजी आमदार अजित गोगटे, संदिप कुलकर्णी यांनी माहिती दिली. १५ मे २०२१ रोजी राज्यात वादळी पावसाने झोडपले. त्यावेळी आंबा गळून  पडल्याने प्रचंड नुकसान झाले. आणि त्याच पडलेल्या आंब्यामध्ये फळमाशांनी प्रचंड प्रमाणात अंडी घातली. तीच अंडी २०२२ मध्ये सक्रिय होऊन त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

फळमाशीचा आंबा निर्यात झाला व आखाती देशातमध्ये एकच गोंधळ माजला. त्यामुळे यंदा हापूस बॅन होईल की काय अशी भीती निर्माण झाली. फळमाशी विरोधामध्ये काय मोहीम राबवता येईल, यावर चर्चा झाली. तसेच मुंबईतील निर्यातदारांनी केलेले विविध प्रयोग प्रयत्न हांडे यांनी सांगितले.

आंब्याचा दर आणि खर्च यातील तफावत कमी करण्यासाठी अगदी छोटे प्रयत्न करून खर्च जास्तीत जास्त कमी करण्याचे त्यांनी आवाहन केले. अतिशिघ्र नाशिवंत या प्रकारात आंबा मोडत असल्याने त्यास हमीभाव मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular