27.8 C
Ratnagiri
Tuesday, July 23, 2024

रिक्त जागी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करा – संघटनेची मागणी

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक...

गणपती स्पेशल रेल्वे अवघ्या ८ मिनिटात फुल्ल झाल्याने संताप

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरम...

राजापुरात पुराची टांगती तलवार, अर्जुना नदी इशारा पातळीवर

गेले दोन दिवस राजापूर शहरात घुसलेले पुराचे...
HomeChiplunमुंबई - गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच काँक्रीटीकरणाला तडे

मुंबई – गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच काँक्रीटीकरणाला तडे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अत्यंत घाईघाईने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाला वालोपे येथे आतापासूनच खड्डे व तडे गेले आहेत. काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे तडे गेलेली गटारे ढासळलेल्या स्थितीत असतानाच आता काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित किले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई- गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेलेले नाही. कापसाळ ते खेरशेतदरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणात चांगली प्रगती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग मिळत आहे. तूर्तास परशुराम घाटात एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.

दरडीच्या बाजूचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यावर ठेकेदार कंपनीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले परशुराम घाटातील चौपदरीकरण आता हळूहळू पूर्णत्वास जात आहे. याच जोडीला शहरातील बहादूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. चिपळूण हद्दीत एकूणच चौपदरीकरणाच्या कामास वेग आला असला, तरी काही ठिकाणी अतिशय घाईघाईने काँक्रिटीकरण केले जात आहे. विशेषतः शहरानजीकच्या वालोपे परिसरात नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणास जागोजागी खड्डे पडून तडेही गेले आहेत. त्यावर पाऊस पडताच है तडे आणखी म दिसून येत आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

गतवर्षी कामथे घाटमाथ्याच्या जवळच कॉक्रिटीकरणाचा काही भाग खचला होता. याविषयी वर्षभर ओरड झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्याच बरोबर चौदरीकरणाअंतर्गत उभारलेले दुभाजकही अनेक ठिकाणी ढासळले आहेत. कापसाळ येथेही मुख्य काँक्रिटीकरण रस्त्याला समपातळी राहिलेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात घाई नको, असा सूर वाहतूकदारांसह ग्रामस्थांमधूनही उमटू लागला आहे. चौपदरीकरणातील गटारांनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. चिपळूण, कळबस्ते, वालोपे, कापसाळ येथे काही ठिकाणी गटारे कोसळलेल्या स्थितीत आहेत. तेथे दुरुस्ती गरजेचीच आहे.

RELATED ARTICLES

Most Popular