27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriकोकणातील नमन, जाखडी लोककलांना मिळणार शासन मान्यता

कोकणातील नमन, जाखडी लोककलांना मिळणार शासन मान्यता

या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत ना. उदय सामंत यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली.

कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी, अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबले यांनी केली. या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत ना. उदय सामंत यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नमन, जाखडी या लोककला आजही येथील मंडळींनी जीवापाड जपल्या आहेत.

पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी नाही. नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खऱ्या अर्थाने गरज आहे. नमन अनेक नाट्यसंमेलनांच्या माध्यमातून जगभर पोहचले. पण कोकणातील नमन, जाखडी सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित आहेत, राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहेत. या कलेची शासन दरबारी आजही नोंद व्हावी, अशी मागणी आहे. कोकणात नमनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. कोकणात या कलेला मोठा जनाधार आहे. नमन, जाखडी या लोकककलांची शासन दरबारी नोंद व्हावी, त्यांना राजाश्रय मिळावा, अशी प्रमुख मागणी आहे.

त्यासाठी नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबले ह्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांनी मंत्री उदय सामंत ह्यांच्या विनंतीनुसार दखल घेत ती मागणी तात्काळ मान्य केली आहे. शासनाकडे या पाठपुराव्यासाठी जिल्हा नमन मंडळ कार्यकरिणीतील सर्व पदाधिकारी, सदस्य यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तर सर्व नमन मंडळे, जाखडी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular