26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriनरेंद्र महाराजांच्या अभिष्टचिंतनासाठी नाम. फडणवीस आज नाणीजमध्ये

नरेंद्र महाराजांच्या अभिष्टचिंतनासाठी नाम. फडणवीस आज नाणीजमध्ये

समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

अखिल मानव जातीच्या कल्याणाचे कार्य हाती घेतलेले जगद्गुरु नरेंद्राचार्याजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा नाणीजमध्ये शुक्रवारपासून सुरु झाला असून शनिवारी या सोहळ्याचा मुख्य समारंभ आहे. या जन्मोत्सवानिमित्त जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्याजींचे अभिष्टचिंतन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस शनिवारी नाणीजमध्ये येत आहेत. त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. जगद्गुरु श्रींच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्यावतीने नागरिकांच्या सेवेत आणखी १० रुग्णवाहिका दाखल होत असून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे.

या १० रुग्णवाहिका सेवेत रुजू होत असल्याने संस्थानच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या आता ५२ होणार आहे. २४ तास अहोरात्र या रुग्णवाहिका तत्पर असतात आणि कोठेही अपघात होताच अवघ्या काही वेळात पोहोचतात आणि रुग्णांना मदत देत रुग्णालयात दाखल करतात. लाखो प्रवाशांचे प्राण वाचविण्याचे काम आजवर संस्थानच्या या उपक्रमातून झाले आहे. ना. देवेंद्र फडणवीस यांचे शनिवारी दुपारी १२ वा. नाणिजधाम येथे आगमन होणार असून प्रथम ते स्वाम जींना भेटून जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतील. त्यानंतर त्यांच्याहस्ते त्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाईल. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हेदेखील उपस्थित असणार आहेत. अन्य मान्यवरही या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular