26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunकार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत तसे ठेकेदार कंपनी, अधिकाऱ्यांवरही करा, आ. शेखर निकम

कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत तसे ठेकेदार कंपनी, अधिकाऱ्यांवरही करा, आ. शेखर निकम

जनेतेत ठेकेदार आणि महामार्ग अधिकारी यांच्या बाबत तीव्र संताप आहे.

रास्ता रोको करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केलेत ना? मग ठेकेदार कंपनी आणि महामार्ग अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करताना तेवढी तत्परता का दाखवली नाही? या साऱ्यावर प्रथम गुन्हे दाखल करा आणि ठेकेदार कंपनीचा प्रमुख, पुलाचे डिझाईन बनविणारे यांना जनतेसमोर चर्चा होईल त्याचवेळी उड्डाणपूलाचा फैसला होईल असा सज्जड इशारा आ. शेखर निकम यांनी दिला आहे. उड्डाणपूल कोसळल्यानंतर महामार्गाचे काम ठप्प झाले आहे. जनेतेत ठेकेदार आणि महामार्ग अधिकारी यांच्या बाबत तीव्र संताप आहे. शुक्रवारी आ. शेखर निकम ‘यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. तहसीलदार प्रवीण लोकरे मुख्याधिकारी, महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कंपनीचे जबाबदार कोण आहेत? – यावेळी आ. शेखर निकम यांनी या ठिकाणी कंपनीचे कोण कोण आहेत, अशी विचारणा केली असता नेहमीचे चेहरे समोर दिसताच जर कंपनीचे कोणी ‘प्रमुख नसतील तर चर्चा कशी करायची? असा सवाल करीत जोपर्यंत प्रमुख या ठिकाणी येत नाही तो पर्यंत चर्चा होणार नाही. कारण यांच्याजवळ चर्चा नेहमीच होते आता प्रमुखाजवळच चर्चा होईल असे स्पष्ट केले.

मग तेवढी तत्परता का नाही? – अनेक वर्षे जनतेचा संताप व्यक्त झाला. अधिकाऱ्यांनी धड उत्तरे दिली नाहीत आणि त्यातून बहादुरशेख येथे रास्ता रोको झाला. प्रशासनाने कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल लागलीच केले असे स्पष्ट करत जनतेचा आवाज कितीवेळ दावणार आहात असा प्रश्नही आ. निकम यांनी केला.

गुन्हे दाखल करा – ठेकेदार कंपनीचे अधिकारी, महामार्गाचे अधिकारी यांचा बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा आहे. अशा दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा नव्हे तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा स्पष्ट सूचना आ. निकम यांनी दिल्या.

दर्जाही कामांची चौकशी करा – यावेळी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी पुलासाठी वापरण्यात आलेल्या स्टील आणि सिमेंट त्याचबरोबर निकृष्ट कामाच्या ज्या ठिकाणी तक्रारी आहेत त्याची चौकशी करा. महामार्गाच्या कार्यालयात एकच अधिकारी एवढ्या मोठ्या कामावर लक्ष कसे राहणार कोण जबाबदार या साऱ्याला असा सवाल त्यांनी केला.

तेव्हाच फैसला – उड्डाणपूलासंदर्भात कंपनीचे जे कोण प्रमुख आहेत त्यांना आणि पुलाचे डिझाईन करणारे असे सारे समोर येऊ देत. येथील जनतेसमोर सर्व गोष्टी होऊ देत मगच पुढील निर्णय घेतला जाईल येथील जनतेला घेऊनच आता बैठक होईल अशा स्पष्ट शब्दात आ. निकम यांनी सूचना या बैठकीत दिल्या. माझ्या येथील जनतेच्या समोर ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांनी खलासे करावेत. येथील जनतेला जर पटले तरच उड्डाणपूलाचे काम सुरू होईल आणि अशी बैठक न घेता जर सुरू करण्याचा प्रयत्न केला तर मग जे होईल त्याला संबंधित जबाबदार असतील असा इशारा आ. निकम यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular