23.3 C
Ratnagiri
Monday, February 6, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraसामनामधून खोके सरकार म्हणून केलेल्या आरोपावर राणेंचे प्रत्युत्तर

सामनामधून खोके सरकार म्हणून केलेल्या आरोपावर राणेंचे प्रत्युत्तर

मी आता आकडा सांगू शकत नाही, मातोश्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोप राणे यांनी केलाय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी, एकनाथ शिंदे मंत्रिपद भूषवत असताना आम्ही जे काही जमविले आहे. ते कुठेही दिले नाही. पंढरपूरला नाही की अक्कलकोटला नाही. मातोश्री आमचे हेडक्वार्टर होते, असा आरोप राणे यांनी केला आहे. मी आता आकडा सांगू शकत नाही, मातोश्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोप राणे यांनी केलाय.

सामनामधून खोके सरकार म्हणून आरोप केला जात आहे. त्यावर राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सरकारला चोर म्हणतात. आता मी चोर मचाये शेर म्हणतो. स्वतः चोऱ्या माऱ्या करून झाल्या आहेत. एकनाथ शिंदे, मी एवढे वर्ष मंत्री पदावर होतो. पण त्या कालावधीत आम्ही काही जमविले, ते कुठेही दिले नाही. ते आम्ही त्यावेळचे आमचे हेडक्वार्टर मातोश्रीवर दिले होते.

मी ३९ वर्ष पदावर आहे. आता तुम्ही भाजपला चोर म्हणत आहे. कधी शिवसैनिकाला पाच हजार रुपये दिलेत का? कोरोनाकाळात सामना वृत्तपत्रात ४३ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे सांगता. त्या काळात सर्वच वृत्तपत्रे तोटयामध्ये होते. साडे तीनशे कोटी रुपयाचे देखील सांगणार आहे. मातोश्रीवर कोणत्या रंगाची पिशवी दिली हे मी प्रतिज्ञापत्रावर सांगतो, होऊ द्या चौकशी, असे आवाहन राणे यांनी खुले आव्हान केले आहे.

शिवसेनेचा हिंदू रक्षणासाठी जन्म झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाताना त्यांना शिवाजी महाराज आठवले नाहीत. महाराजांचे नाव, झेंडा, मराठी माणसाच्या नावाने दुकान चालविले आहे. लायकी शून्य, पात्रता शून्य असताना मुख्यमंत्री पड मिळाले आहे. यापुढे आत्ता सत्ता विसरून जा. एकीकाळे शिवसेनेला वाघ म्हणतात. आता रेडे म्हणतात, उद्या अजून काय म्हणाल,  अशी टीका ही राणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular