31.2 C
Ratnagiri
Thursday, May 16, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeRatnagiriग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ – पालकमंत्री सामंत

ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ – पालकमंत्री सामंत

विरोध करणाऱ्यांना आम्ही रिफायनरीचे महत्व समजावून सांगू.

आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल, तर रिफायनरी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. नाहीतर आपण फक्त बेरोजगारीचे कारखाने तयार करू, ही सर्व भूमिका आम्ही शेतकऱ्यांना पटवून देऊ, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची जी भूमिका घेतलेली आहे. त्यांच्यासाठी कोणाच्याही शिफारसीची आवश्यकता नाही. त्यांचे संरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. अजूनही संरक्षणात वाढ करायची असेल तर चिंता नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सूचना करेन, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते सोमवारी रत्नागिरीत बोलत होते.

तसेच राजापूरमध्ये सध्या जे काही टेस्टिंग चालू आहे. त्यासाठी काही लोकांनी परमिशन दिलेली आहे. काहीनी परमिशन दिलेली नाही. ज्यांनी परमिशन दिली नाही त्यांची आम्ही समजूत काढू,  ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच प्रकल्प विरोध मोडून काढणं, ही वेगळ्या कोणाची तरी स्टाईल असेल, आमची ती स्टाईल नाही.

विरोध करणाऱ्यांना आम्ही रिफायनरीचे महत्व समजावून सांगू. इथला परिसर कसा सुजलाम सुफलाम होईल, हे समजून सांगू आणि ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ. त्यामुळे विरोध मोडून काढण्याचा काही प्रश्नच येत नाही, असे मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. तसेच नाटे येथे क्रूड टर्मिनससाठी ५०० एकर जमीन घेणार आहोत. त्या सर्व जमिनीची संमती पत्र मिळालेली आहेत. काही लोक गैरसमज पसरवत आहेत. तसेच २९०० एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आलेली आहे. तसेच राजन साळवी यांनी जे जनतेचे प्रश्न मांडलेले आहेत. ते पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular