29.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeRatnagiriरत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट

रत्नागिरीत प्रथमच होणार राष्ट्रीय ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट

रत्नागिरीतील निसर्गसुंदर अशा भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पावले आता वळू लागले आहेत. हळुहळू गर्दीसुद्धा वाढायला लागली आहे. तोच धागा पकडून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व रत्नागिरीतील पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून रत्नागिरी फिशर्स क्लबने राष्ट्रीयस्तरावरील ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट प्रथमच आयोजित केली आहे.स्पर्धा भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर २८ मे रोजी सकाळी सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू राहील. ६ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ५० हजार, ३० हजार, २० हजार रुपये आणि तिघांनाही रॉड व रिळ व अन्य फिशिंग संदर्भातील वस्तू देण्यात येतील. याव्यतिरिक्त इतर खास पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक अँगलर्सला २००० रुपयांचे वेलकम किट आणि आकर्षक ग्रुप टिशर्ट, ग्रुप कॅप, चहा-नाष्टा, जेवण, चहा व इतर अनेक आकर्षक बक्षिसे दिली जातील.

ही स्पर्धा १०० लोकांसाठीच होईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. रत्नागिरीत राष्ट्रीयस्तरावरील पहिलीची स्पर्धा होत आहे. यानिमित्त पर्यटनालाही गती मिळू शकते. अनेक स्पर्धक आणि पर्यटक बाहेरून या स्पर्धेसाठी येतील. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नित्यानंद भुते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष सावंत, केतन भोंगले, आसिफ भाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सर्फ फिशिंग म्हणजे – सर्फ फिशिंग म्हणजे समुद्रकिनाऱ्यांवर मिळणाऱ्या माशांना गळ टाकून पकडले जाते आणि त्यानंतर वजन करून सुरक्षितरीत्या पुन्हा समुद्रात सोडले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा खेळवली जाते. रत्नागिरीत यापूर्वी जिल्हास्तरीय सर्फ फिशिंग स्पर्धा घेण्यात आली होती. आता राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा प्रथमच होत असल्याने रत्नागिरीकरांमध्येही उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular