24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeIndiaनवज्योतसिंग सिद्धूला ३४ वर्षे जुन्या प्रकरणात एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

नवज्योतसिंग सिद्धूला ३४ वर्षे जुन्या प्रकरणात एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

पोलिसांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदरसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना ३४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्धूच्या हल्ल्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू ओढवला होता. यापूर्वीच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. पण आता निकाल बदलल्याने एकतर सिद्धूला अटक होईल किंवा त्यांना शरण यावं लागेल. पंजाब पोलिसांना याप्रकरणी कायद्याचे पालन करावे लागणार आहे.

१९८८ चे सिद्धूविरुद्धचे हे प्रकरण आहे. पतियाळा येथे पार्किंगवरून सिद्धूंचे गुरनाम सिंग नामक ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीसोबत भांडण झाले होते. त्यांच्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे देखील सांगण्यात आले. ज्यामध्ये सिद्धूंनी गुरनाम सिंह यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यामध्ये गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदरसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुनावणी दरम्यान सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी १९९९ मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पीडित कुटुंबाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणी २००६ मध्ये उच्च न्यायालायने नवज्योतसिंग सिद्धूला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु, या शिक्षेविरोधात नवज्योत सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर १६ मे २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवले होते. यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही.

परंतु, आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मृताच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली असून, उच्च न्यायालयाप्रमाणे सिद्धूला कलम ३०४ अंतर्गत शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून त्यावर आपला निर्णय बदलवत सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला शिक्षा सुनावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular