27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeChiplunचिपळुणात राष्ट्रवादीने भाकरी फिरवली

चिपळुणात राष्ट्रवादीने भाकरी फिरवली

मुरादभाई अडरेकर यांची चिपळूण तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीने भाकरी परतवण्याचा निर्णय घेत माजी आमदार रमेश कदम यांचे खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते शांत संयमी अजातशत्रू तरुण मुरादभाई अडरेकर यांची चिपळूण तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मुराद अडरेकर हे चौथे चिपळूण तालुकाध्यक्ष ठरले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विद्यमान आमदार शेखर निकम यांनी ना. अजितदादा पवार यांची साथ देत त्यांच्या गटात प्रवेश केला. साहजिकच तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी अजितदादा पवार यांच्या गटात सामील झाले. माजी आमदार रमेशभाई कदम यांनी संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची बाजू घेत मूळ पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला.

त्या अनुषंगाने त्यांनी समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली ताकद देखील दाखवून दिली होती.दरम्यान खासदार शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षातील नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत. चिपळूणचे तालुकाध्यक्ष अजितदादा गटात गेल्याने ती जागा रिक्त होती. त्या जागेवर आता नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अत्यंत शांत संयमी तरुण चेहरा तसेच माजी आमदार रमेश कदम यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मुराद अडरेकर यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सुमारे २१ वर्षानंतर चिपळूण राष्ट्रवादीला नवीन तालुकाध्यक्ष मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होताच रमेशभाई कदम हे पहिले अध्यक्ष बनले. ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शौकत मुकादम हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष झाले. मुकादम यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला आक्रमक स्वरूप दिले. त्यानंतर २००९ साली जयंद्रथ खताते यांची तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. ते अद्यापपर्यंत त्या पदावर कार्यरत होते. त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यानंतर नवीन तालुकाध्यक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याचे उत्तर आज मुरादभाई अडरेकर यांच्या नियुक्तीने मिळाले. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular