26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunप्राथमिक आरोग्यकेंद्रे बळकट करण्याची गरज - डॉ. कोतकुंडे

प्राथमिक आरोग्यकेंद्रे बळकट करण्याची गरज – डॉ. कोतकुंडे

गेल्या काही वर्षात ही गावपातळीवरची कमी खर्चिक यंत्रणा मजबूत करण्याऐवजी खर्चिक मोठे दवाखाने निर्माण केले जात आहेत.

सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्याची आवश्यकता या क्षेत्रातील जाणकार मंडळी सांगत असतात; मात्र याबाबत कोणतेच सरकार गंभीर नाही, हे अंदाजपत्रकातील तरतुदीवरूनच लक्षात येते. सर्वांना चांगले आरोग्य लाभण्यासाठी मोठ्या दवाखान्यापेक्षा प्राथमिक आरोग्यकेंद्रे बळकट करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. कोतकुंडे यांनी केले. सार्वजनिक आरोग्यसेवेचा अभ्यास करताना त्यात हाती आलेले अनुभव आणि निरीक्षणे याबाबत ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. असता त्यांनी त्यावर तपशीलाने भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘आशा सेविका या डॉक्टर आणि जनतेमधील दुवा असतात. त्यांना पुरेसा व वेळच्यावेळी पगार मिळाला पाहिजे.

प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या डॉक्टरांना वेळोवेळी सार्वजनिक आरोग्य व विशेष उपचारांचे ट्रेनिंग मिळाले पाहिजे जेणेकरून ते रोगप्रतिबंधन तसेच रोगनिदान चोख करू शकतील. मनाच्या आरोग्यासाठी आरोग्यकेंद्राच्या डॉक्टरांना व नर्सेसना ट्रेनिंग मिळाले तर ८० टक्के मनोरुग्णांना गावपातळीवर उत्तमरित्या उपचार मिळू शकेल.’ दहा ते वीस टक्के गंभीर रुग्णांना स्पेशॉलिस्ट असेल तिथे रुग्णालयात पाठवण्याची गरज असते; परंतु गेल्या काही वर्षात ही गावपातळीवरची कमी खर्चिक यंत्रणा मजबूत करण्याऐवजी खर्चिक मोठे दवाखाने निर्माण केले जात आहेत. दवाखाना असला तरी डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत, संसाधने नाहीत ही परिस्थिती सर्वत्र दिसते. सेवा सुधारण्यासाठी लोकशाहीत लोकांधारित देखरेख प्रक्रिया महत्त्वाची ठरते; परंतु खासगीकरणाच्या रेट्यात या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. प्रसंगी या समस्यांसाठीही डॉक्टरांना दोष दिला जातो.

वास्तविक इथे डॉक्टरांचा काही दोष नसतो. लोकांधारित देखरेख प्रक्रियेअंती लोकप्रतिनिधिनी शासनदरबारी पाठपुरावा करणे अपेक्षित असते. एका सक्षम आरोग्ययंत्रणेत जनता महत्त्वाची स्टेकहोल्डर असते व तिचा सक्रिय सहभाग खूप महत्वाचा असतो. जनतेने आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या मागण्या जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य मंत्रालयात पोचवायच्या असतात; परंतु गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधींच्या निष्ठेचेच प्रश्न उभे राहिले आहेत. संविधानिक कृती सोडून ते सिंघम स्टाईलने डॉक्टरांना वेठीस धरताना दिसतात, असे तणावग्रस्त डॉक्टरांचे समुपदेशन माझ्यासारखे डॉक्टर करत असतात. हे सगळे बदलायचे असेल तर रुग्णांनी आपल्या गावातील दवाखाना अजून सक्षम कसा करता येईल यासाठी यंत्रणा कशी चालते ते समजून घेऊन सक्रिय सहभाग घ्यावा.

RELATED ARTICLES

Most Popular