28.3 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeRatnagiriएस. टी. महामंडळात सध्या ७० टक्के चालक, नवीन भर्ती स्वतंत्र वाहकांसाठी करा

एस. टी. महामंडळात सध्या ७० टक्के चालक, नवीन भर्ती स्वतंत्र वाहकांसाठी करा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस.टी. महामंडळात भर्ती करण्याची घोषणा केली.

एस.टी. महामंडळात मोठी भरती होणार असल्याने कोकणातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला असून आता पुन्हा एकदा कोकणातील तरुण एस.टी.त वाहक पदावर मोठ्या प्रमाणात रुजू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र महायुती सरकारने या भर्तीबाबतचा निकष बदलणे गरजेचे आहे. चालक वाहक अशी भर्ती न करता वाहकांची स्वतंत्र भर्ती करावी आणि कोकणी जनतेची दुवा घ्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान सध्या एस.टी. महामंडळात ७० टक्के हे चालक -वाहक आहेत. म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त चालक असताना आणखी चालकांची गरज काय? वाहकांची संख्या वाढवा अशी रास्त मागणीही प्रवाशांसह कोकणी जनतेतून होत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एस.टी. महामंडळात भर्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर दहावी पास, बारावी पास तरुणांमध्ये उत्साह संचारला. मात्र वाहकांची स्वतंत्र भर्ती होणे गरजेचे आहे.

यापूर्वीच्या या चालक कम वाहक अशा पदांसाठी झाल्यामुळे वाहक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची घोर निराशा होत आहे. यावेळीही तशीच परिस्थिती ओढवेल की काय? अशी भीती कोकणी जनतेतून व्यक्त होत आहे. युती सरकारच्या कालावधीत दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी चालक हाच वाहक आणि वाहक हाच चालक असा निकष लावत मोठ्या प्रमाणात एस.टी. महामंडळात भर्ती केली होती. त्यावेळी ते एस.टी. महामंडळाचे पदसिध्द अध्यक्षही होते. त्यामुळेच त्यांच्या भागातील म्हणजेच विदर्भ, मराठवाडा येथील तरुण मोठ्या प्रमाणात एस.टी.त भरती झाले. कोकणात चालक आणि वाहक या पदासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतके उमेदवार भर्ती झाले. आता पुन्हा एकदा भर्ती होत असल्याने कोकणी बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र ही भर्ती वाहक पदासाठी स्वतंत्र करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या एस.टी. महामंडळांत ७० टक्के चालक आहेत. म्हणजेच वाहकांपेक्षा त्यांची संख्या अधिक आहे. आतातरी वाहकांसाठी स्वतंत्र भर्ती करुन समतोल राखला जावा. चालक – वाहक ही भर्ती करण्यामागे अपूरा कर्मचारी वर्ग होता असे मानले तरी आता वाहकांची जी उणीव आहे ती स्वतंत्र वाहक भर्ती करुन पूर्ण करावी जेणेकरुन कोकणातील तरुणांनाही न्याय मिळेल अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान एक माणूस दोन कामे कशी करेल? एकावेळी तो गाडीतरी चालवेल किंवा तिकीटे तरी फाडेल. मायबाप सरकारने या सर्व मुद्यांचा विचार करुन कोकणी माणसाला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांची दुवा घ्यावी अशी मागणीही होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular