आपण वॉरझोनमध्ये असतो तेव्हा मागेपुढे पहात नाही. कार्यकर्ता मरमर मरत असतो. त्याच्यासाठी आज काही केले नाही तर तोच कार्यकर्ता वचपा काढल्याशिवाय शांत बसणार नाही. रत्नागिरीने मला भरभरून दिले आहे. ज्यावेळी हाक माराल त्यावेळी निलेश राणे तुमच्यासाठी उभा असेल, असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी कार्यकत्यांशी बोलताना व्यक्त केला. विजयादशमीच्या दिवशी राजकीय संन्यास घेण्याचे ट्रिट केल्यानंतर निलेश राणे यांच्याकडे राज्याच्या नजरा लागून होत्या. मुंबईत बंद दाराआड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि त्यानंतर लगेचच रत्नागिरी दौऱ्याची घोषणा झाली.
प्रेम नेहमीच मिळाले – यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, हातिवले ते रत्नागिरी जंगी स्वागत झाले. रत्नागिरीकरांचे प्रेम मला नेहमीच मिळाले आहे. या प्रेमाने भारावलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजवर जे काही कमावले ते रत्नागिरीकरांच्या प्रेमामुळेच. आपुलकीचे नाते निर्माण होऊ शकले.
तर कोण कुठे जाईल सांगता येत नाही – सर्व गोष्टींसाठी निलेश राणे तुम च्यासोबतच आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, निलेश राणे बाळ मानेंसोबत शेवटपर्यंत उभा असेल. परंतु २०२९ ला महिला आरक्षण लांगू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या म तदारसंघात महिला आरक्षण पडेल हे सांगता येत नाही. २०२९ ला कोण कुठे असेल हे आता सांगणे कठीण आहे.
आपण मैदानी कार्यकर्ते – राणे हे पद माझ्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत तुमच्यासाठीच कार्यरत राहीन. आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. मैदानी कार्य कसे करायचे हे चांगले अवगत आहे असे सांगून कार्यकत्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
रत्नागिरीत जंगी स्वागत – प्रदीर्घ काळानंतर माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. हातखंब्यापासून जयस्तंभापर्यंत स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सो जयस्तंभ परिसरात क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार घालून निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाजपा कार्यालयात पोहोचल्यावर देखील त्यांचे तिथे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.