21.4 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeChiplunघातपात नाही, विषबाधा नाही, आता निलिमावर कसला ताण होता, याकडे पोलिसांचे लक्ष...

घातपात नाही, विषबाधा नाही, आता निलिमावर कसला ताण होता, याकडे पोलिसांचे लक्ष केंद्रीत

फॉरेन्सिक लॅबचा व्हिसेराचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.  यामध्येही तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य आढळुन आलेले नाही.

चिपळुणच्या निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात आणखी एक ट्रिस्ट निमणि झाले आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी फॉरेनसिक लॅबला पाठवलेल्या व्हिसेराचा अहवाल काल उशिरा प्राप्त झाला. तिच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी द्रव्य आढळुन आले नसल्याचे त्यात म्हटले आहे. म्हणजे अहवाल निरंक आला आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याला दुजोरा दिला. घातपात नाही, विषबाधा नाही, आता पोलिसांनी निलिमावर कोणत्या कामाचा प्रचंड ताण होता, याकडे लक्ष केंद्रीत केले असल्याने तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे. नीलिमा चव्हाण हिचा घातपात नाही, मग मृत्यू कशामुळे प्रश्नाचे अजूनही अनुत्तरितच आहे.

आता जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्याकडून शवविच्छेदनाचा रिपोर्ट येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. नीलिमा चव्हाण हिच्या शरीरावर किंवा अंतर्गत कोणत्याही जखमा विच्छेदनात दिसुन आलेल्या नाहीत. त्यामुळे हा घातपात नसल्याचा निर्वाळा पोलिस दलाने यापूर्वीच दिला आहे. निलिमाची पर्स मिळावी यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ८ टिम यावर काम करीत आहे. दाभोळ खाडी पिंजून काढली जात आहे. परंतु अजून काही तिची पर्स मिळालेली नाही. त्यात फॉरेन्सिक लॅबचा व्हिसेराचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.  यामध्येही तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य आढळुन आलेले नाही.

अहवाल निल आला आहे. त्यामुळे आता ही शंकाही उरलेली नाही. परंतु निलिमा चव्हाण मृत्यू पुर्वी काही दिवस प्रचंड माणसिक तणावाखाली होती. हे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्याबाबतचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये तिने आपल्या मित्राला या तणावाबाबत माहिती दिल्याचे समजते. पोलिस आता त्यादृष्टीने तपास करीत आहे. त्यामुळे निलिम ला कामाच्या ठिकाणी काही ताण होता का, तो काय होता, त्यातून काही , घडले आहे का? या प्रश्नाची उकल आता पोलिस करणार आहेत. त्यानंतर या मृत्यू प्रकरणचा छडा लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular