27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedखेड तहसीलमध्ये अग्निशमन व्यवस्था नाही

खेड तहसीलमध्ये अग्निशमन व्यवस्था नाही

दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आलेला नाही.

खेड शहरामध्ये तहसील कचेरीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा तळमजला व पहिला मजल्याचे बांधकाम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर या इमारतीमध्ये तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू झाले असले तरी अग्निशमनाची कोणतीही व्यवस्था अथवा साहित्य या कार्यालयामध्ये आढळून येत नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, तहसील कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी, दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आलेला नाही. खेड तहसील कार्यालयाचे कामकाज २०१९ मध्ये शहरातील जुन्या इमारतीच्या जागेत उभारण्यात आले. या नवीन मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरू होत असताना संबंधित ठेकेदाराने काही त्रुटी ठेवल्या.

परिणामी, येथे कामासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. खेड तहसील कार्यालयाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडता येईल, अशी व्यवस्थाच केलेली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी आणि आगीसारखा कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्याच्यावर प्राथमिक उपाययोजना तातडीने करता येईल यासाठी अग्निशमनचे कोणतेही साहित्य या इमारतीच्या पहिल्या व तळमजल्यावर दिसून येत नाही. पाच वर्षे उलटून देखील त्या ठिकाणी यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर कामाच्या निवेदनामध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी निधीची तरतूद नाही, अशी माहिती तहसीलदार सोनावणे यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular