22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeKokanदिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा थेंब नाही, प्रवाशांचे प्रचंड हाल

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा थेंब नाही, प्रवाशांचे प्रचंड हाल

एवढा लांबचा प्रवास आणि पाण्याची नसणारी उपलब्धता हि अतिशय गंभीर समस्या बनत चालली आहे.

कोरोना काळानंतर कोकण रेल्वे पूर्वीप्रमाणे धावू लागली आहे. परंतु, काही ना काही अडचणी मात्र अजून देखील सतावतच आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाणीच उपलब्ध नसल्याने प्रवासी वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मे महिन्याच्या ऐन गर्दीच्या मोसमात हजारो प्रवासी प्रवास करीत असताना दिव्याहून सावंतवाडीला जाणार्‍या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये बहुसंख्य डब्यात बेसिनसह टॉयलेटमध्ये पाण्याचा खडखडाट असल्याचे निदर्शनास आले.

शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. यापूर्वीही सतत असे प्रकार घडत असल्याने प्रवासी वर्गातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर दररोज दिव्याहून सावंतवाडीसाठी सुटणारी १०१०५ या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचा लूक अलिकदेच बदलण्यात आला आहे. मात्र, बाह्यरूप बदललेले असले तरी या एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर आले आहेत.

या एक्स्प्रेसच्या बहुसंख्य डब्यातील टॉयलेटसह बेसीनमध्ये पाणीच नव्हते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांनी तर बिसलरी पाण्याच्या बाटल्या घेवून बेसिनवर तोंड धुतले. तर, काही प्रवाशांनी टॉयलेटसाठी बिसलरी पाण्याच्या बाटल्या वापरल्या.

यामुळे बिसलरी विक्रेत्यांचा जरी मोठ्या प्रमणात खप झाला असला तरी, बहुतांशी डब्यामध्ये बेसीनपासून टॉयलेटमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. याकडे कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे,अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होऊ लागली आहे. एवढा लांबचा प्रवास आणि पाण्याची नसणारी उपलब्धता हि अतिशय गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे योग्य ती व्यवस्था रेल्वे प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular