25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriचार नव्हे इतक्या मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे विनायक राऊत

चार नव्हे इतक्या मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे विनायक राऊत

सरकारमधील ५ मंत्र्यांना हटवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपाचा दबाव असल्याचा आरोप होत असतानाच शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी ४ नव्हे १० मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. चार ऐवजी १० मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. चार मंत्री बोलघेवडे मंत्री आहेत. त्यांची मंत्रीपदे गेली पाहिजेत. मंत्र्याच्या माध्यमातून कुठलीच कामे जनतेची होत नाहीत, असा आरोपही खा. विनायक राऊत यांनी केला आहे.ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. आपण बुधवारी अभ्यासकांसम वेत बारसूच्या सड्यावर आणि राजापुरात अन्य ठिकाणी असलेल्या कातळशिल्पांच्या पाहणीसाठी चाललो आहोत असेही खा. विनायक राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी एक कातळ शिल्प पाहिले. कातळ शिल्पावर अभ्यास होणं गरजेचं आहे. कातळशिल्पाचे संवर्धन जतन करणे यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हंटलं. वारकऱ्यांवर लाठीचार्ज हा अत्यंत निंदनीय प्रकार रविवारी घडला. संत परपंरा वारकरी परंपरा आहे. त्यांनी जगाला आदर्श घडवून दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी लाठी चार्ज केला. त्याची निंदा करतो, असंही विनायक राऊत म्हणाले. सरकारला काही वाटेनासे झालंय. बेशर्मी लोकांचे हे सरकार वारकऱ्यांना धोपटतात आणि दारुवाल्यांना आश्रय देतात, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. लव्ह जिहादेवाल्यांना कायद्यांनी बंदी घातली पाहिजे. औरंगजेबाचे भूत असंच आलं नाही. एमआयएमच्या माध्यमातून हे भूत भाजपने आणलंय. भाजप आणि मिंधे घट उरावर बसणार. त्याची सुरवात डोंबीवलीपासून झाली, अशी घणाघाती टीकादेखील खा. विनायक राऊत यांनी भाजपवर केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular