27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriकोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाचा रत्नागिरीत पहिल्याच दिवशी प्रवाशांना फटका

कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाचा रत्नागिरीत पहिल्याच दिवशी प्रवाशांना फटका

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक शनिवार दि. १० जूनपासून लागू झाले. मात्र या बदललेल्या वेळापत्रकाची खबर नसलेल्या प्रवाशांना त्याचा पहिल्याच दिवशी जोरदार फटका बसला. आधीच्या नियोजित वेळापत्रकानुसार अनेक प्रवासी जनशताब्दी एक्सप्रेससाठी स्थानकावर दाखल झाले असता वेळापत्रक बदलल्याची माहिती त्यांना मिळाली आणि गाडी नव्या वेळेनुसार रत्नागिरी स्थानकातून रवाना झाल्याचे कळताच संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला.

अधिक वृत्त असे की, पावसाळी हंगाम लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आपल्या काही गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. पावसाळा लक्षात घेऊन काही ठिकाणी वेगही कमी केला आहे. १० जूनपासून हे नवीन वेळापत्रक लागू झाले. मात्र अनेक प्रवाशांना या नवीन वेळापत्रकाची कल्पना नव्हती.

मडगांव ते मुंबई अशा धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस जुन्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ६.१० वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानकातून ‘पुढील प्रवासाला निघते. पावसाळी वेळापत्रकात या गाडीची रत्नागिरीतून सुटण्याची वेळ सायंकाळी ४.५५ वाजता आहे. १० जूनला सायंकाळी ४.५५ वाजता जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वेस्थानकातून रवाना झाली. त्यानंतर तिकीटावर असलेल्या जुन्या वेळेनुसार प्रवासी रेल्वेस्थानकात आले. त्यांना गाडी निघून गेल्याचे कळताच गोंधळ झाला. बुकिंग विंडोवर जाऊन प्रवाशांनी याबाबत जाब विचारला.

या गाडीचे आरक्षण असलेल्या एका प्रवाशाने पत्रकारांना माहिती देताना सांगितले की आम्ही जेव्हा आरक्षण केले त्यावेळी देण्यात आलेल्या तिकीटावर पावसाळी वेळ नव्हती. जी वेळ होती त्यानुसार आम्ही स्थानकावर आलो. मात्र आता आमची गाडी चुकली असे सांगण्यात येत आहे. तिकीटावरील वेळ दाखवून अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. वेळ निश्चिती वरिष्ठ पातळीवरून होते असे सांगत संतप्त प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. गाडी आधीच सुटून गेल्याने प्रवाशांचे नुकसान व्हायचे ते झालेच जोडीला मन:स्तापही झाला, असे अनेक प्रवासी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular