27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeUncategorizedराजापुरात स्थलांतरित होण्याच्या ३०० च्यावर नागरिकांना नोटिसा

राजापुरात स्थलांतरित होण्याच्या ३०० च्यावर नागरिकांना नोटिसा

लोकसहभाग आणि जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीतून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांमधील गाळाचा उपसा झाला आहे. गाळ उपशानंतरही पूरस्थिती ओढवल्यास लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून नगरपालिका प्रशासनाने पूररेषेत वास्तव्यास असलेल्या आणि संभाव्य पुराचा धोका असलेल्या सुमारे ३०० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यातील अतिवृष्टीमध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याचा शहराला सातत्याने वेढा पडून शहरातील जनजीवन विस्कळित झाले असते. दरवर्षीच्या या स्थितीमध्ये अद्यापही बदल झालेला नाही.

पूरस्थितीच्या या समस्येवर मात करण्यासाठी यावर्षी नाम फाऊंडेशनचा पुढाकार आणि लोकसहभागातून नद्यांमधील गाळाचा उपसा केला आहे. त्याला जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीचीही जोड मिळाली आहे. गाळ उपशामुळे नदीचे पात्र रुंदावले असून पात्राची खोलीही वाढली आहे. यानंतर यावर्षी नद्यांना पूर येणार का ? पूर आल्यास त्याची तीव्रता किती राहणार? याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहीलेली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेवून खबरदारी म्हणून प्रशासनाकडून पूररेषेमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटिसाबजावल्या आहेत.

काय आहे नोटिशीमध्ये – पूररेषेमध्ये आपले वास्तव्य असून, पुराच्या पाण्यापासून आपल्या घराला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळी हंगामात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत दक्षता म्हणून आपल्या कुटुंबीयांसह सुरक्षितस्थळी तत्काळ स्थलांतरित व्हावे. पुराच्या पाण्यामुळे इमारतीची वित्तहानी अगर मानवी वा जीवितहानी झाल्यास त्याबाबतची कोणतीही नुकसानभरपाई शासनाकडून अगर या कार्यालयाकडून मिळणार नाही. त्याची जबाबदारी शासनावर वा अगर या कार्यालयावर राहणार नाही. आपण पावसाळी हंगामात स्थलांतरित न झाल्यास होणाऱ्या हानीला आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular