मिऱ्या- नागपूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिग्रहित जागेलगतच्या घरे, दुकानांची बांधकामे हटवण्याच्या नोटीस संबंधित मालकांना बजावल्या आहेत. ही बांधकामे अनधिकृत असून, महामार्ग सुरू झाल्यानंतर अपघाताची शक्यता असल्याची कारणे देऊन, अशी बांधकामे हटवण्यासाठी नोटीस दिल्या आहेत. यापूर्वी देखील मार्गाच्या मधोमध अतिक्रमण करण्यात आलेली शेकडो अतिक्रमणे प्राधिकरणाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीने हटवली होती. आता महामार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या नोटिसा बजावल्या आहेत. मिऱ्या नागपूर मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी ४५ मीटरपर्यंतच्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
या महामार्गावरील साळवी स्टॉप ते हातखंब्यापर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध असलेली अनधिकृत बांधकामे प्राधिकरणाने हटवली होती; परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरवात न झाल्याने ती अनधिकृत बांधकामे पुन्हा उभी राहिली आहेत. महामार्गाच्या जागेबाहेर अनेक घरे आणि दुकानांची बांधकामे झालेली आहेत. भविष्यात या बांधकामांमुळे अपघातांचा धोका असल्याने ही कोणतीही परवानगी न घेता केलेली बांधकामे काढून टाकण्याबाबत संबंधित मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
यामध्ये सुमारे १५ जणांचा समावेश आहे. या संदर्भात अनेक मालकांनी प्राधिकरणाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे. महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर अपघातग्रस्त परिस्थिती निर्माण होत असेल तर आमची बांधकामे काढून टाकू, आहे. असे उत्तरात कळवण्यात आले. या संदर्भात तहसिलदारांशी संपर्क साधला असता. मिऱ्या नागपूर महामार्गावरील साळवी स्टॉप ते कुवारबाव या दरम्यान रस्त्यावर असणारी अनधिकृत 15 बांधकामे हटविण्याच्या नोटीसा संबधितांना बजावण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली.