27.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRajapurकाही चिरीमिरी लोक विरोध करीत आहेत; पण आम्ही त्याला महत्व देत नाही...

काही चिरीमिरी लोक विरोध करीत आहेत; पण आम्ही त्याला महत्व देत नाही – निलेश राणे

केंद्र सरकारला राज्य शासनाच्या एमआयडीसी विभागाने पत्रव्यवहार करत हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा,  अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भाजपचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी बहुचर्चित असलेला राजापूर रिफायनरी प्रकल्प होणारच, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. बारसू-सोलगावसह नाणारवासीय सुद्धा रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक आहेत. याबाबत नाणार वासीयांनी सुद्धा रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समर्थन असल्याचे सांगून आपल्या जमिनीचे सातबारे त्यांच्याकडे दिलेत. दिल्लीत पेट्रोलियम मंत्री पुरी यांच्या दालनात राजापूर रिफायनरीसंदर्भात मीटिंग पार पडली. केंद्र सरकार रिफायनरी राजापूर बारसू येथे आण्यासाठी सकारात्मक आहे आणि योग्य ती पावलं उचलण्यास गती येत आहे.

राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी सुद्धा रिफायनरी प्रकल्प सुरु होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्‍यातील रिफायनरीला आता कोणताही विरोध उरलेला नाही, असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे. केंद्र सरकारला राज्य शासनाच्या एमआयडीसी विभागाने पत्रव्यवहार करत हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा,  अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला विशेष कोणाचा विरोध राहिलेला दिसून येत नाही. फक्त काही चिरीमिरी लोक विरोध करीत आहेत;  पण त्याला आम्ही महत्व देत नाही,  असे यावेळी राणे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे आणि प्रमोद जठार यांनी नुकतीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान संपूर्ण सकारात्मक चर्चा झाली असून, पेट्रोलियम मंत्र्यांनी येत्या कॅबिनेट मध्ये रिफायनरी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

भविष्यात मोठा रोजगार कोकणात निर्माण होणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात लवकर करावी अशी आग्रही मागणी यावेळी केली. येथील वस्तुस्थिती त्यांना सांगण्यात आली, त्यामुळे आता केंद्र सरकार रिफायनरी प्रकल्प उभा राहण्यासाठी ठोस पाऊले उचलणार असल्याचा शब्द पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी दिला आहे, असेही निलेश राणे पुढे म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular