महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार, रत्नागिरी,रायगडसह अनेक जिल्ह्यांचे होणार विभाजन ?

2411
The number of districts will increase in Maharashtra

प्रशासकीय काम काजात सुलभता यावी आणि जनतेलाही सुविधा वेळेवर आणि तत्परतेने जिल्ह्यांचे विभाजन केले जाणार आहे.मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रातील त्यामुळे महाराष्ट्रात २२ जिल्हे नव्याने तयार करण्याचा विचार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड तर रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा बनवणे प्रस्तावित आहे. राज्यात २०१४ पासून नवीन जिल्हा तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी जिल्ह्याचे लागत आहे.शिवाय भौगोलिक अंतर पाहता जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकाला जिल्हा मुख्यालयाला कामानिमित्त जाण्यासाठी किमान एका दिवसाचा वेळ खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची मोठी व्यवस्था होत आहे. जिल्ह्यांचे विभाजन यामुळे भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवोदित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा देखील केली होती. दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्या नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. प्रस्तावित २२ जिल्ह्याची यादी करणार अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून भालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे. पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे. पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.

रायगड, रत्नागिरीचे विभाजन याशिवाय रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई जिल्हा तयार केला जाणार आहे. लातूरमधून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे. जळगावमधून भुसावळ अन बुलढाणामधून खामगाव हे जिल्हे तयार होणार आहेत. अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचें. विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.