मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारतट्रेन धावणार, या तारखेला शुभारंभ

7179
Vande Bharat Train

मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ मे रोजी मडगाव येथे हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्याने रेल्वे मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत सेवा सुरू करीत आहे. याआधी मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. मुंबई- गोवा वंदेभारत एक्सप्रेस ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी पाचवी सेमी-हाय स्पीड ट्रेन असेल. चेन्नईस्थित कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत तयार झाली आहे. पहिली वंदेभारत ट्रेन फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली-वाराणसी या ट्रॅकवरून धावली. वंदेभारत अत्याधुनिक असून ताशी १८० कि. मी. वेगाने पळेल यात स्वयंचलित. दरवाजे, वायफाय, जिपीएस आधारित प्रवाशांना माहिती, आरामदायी आसने ,एरोडायनामिकल डिझाईन आणि ३० टक्के ऊर्जा बचत यामुळे वंदे मातरम् दिवसेदिवस लोकप्रिय होत आहे.