उदय सामंत फाऊंडेशन आणि रत्नागिरी तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने ४ सप्टेंबरपासून ना. उदय सामंत यांच्या मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील एकूण १० जिल्हा परिषद गटात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरवात ४ सप्टेंबर पासून होणार असून स्पर्धेची सांगता १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. तालुक्यातील २३४ संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. तालुक्यातील पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या मतदार संघात होणाऱ्या भव्य मंगळागौर स्पर्धेसाठी अनेक महिलांच्या गटांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
जिल्हा परिषद गटांमध्ये होणाऱ्या स्पर्धेचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. नाचणे जिल्हा परिषद गटामध्ये २२ संघ सहभागी झाले असून ४ सप्टेंबरला स्वामी समर्थ हॉल, नाचणे येथे स्पर्धा होणार आहे. कोतवडे गटाम ध्ये २३ संघ असून ५ सप्टेंबरला महालक्ष्मी हॉल, गणपतीपुळे येथे होणार आहे. वाटद गटात २७ संघांची नोंद झाली असून ६ सप्टेंबर सर्वसाक्षी हॉल, वाटद येथे होईल. करबुडे गटात २२ संघ असुन ८ सप्टेंबरला दत्तकृपा मांगल्य मंगल कार्यालय, जाकादेवी येथे होणार आहे.
शिरगांव जिल्हा परिषद गटात ९ सप्टेंबरला ओंकार मंगल कार्यालय, शिरगांव, तर गोळप गटात १० सप्टेंबरला फणसोप हायस्कूल, फणसोप सडा येथे होणार असुन २३ संघांनी सहभाग घेतला आहे. मिरजोळेमध्ये २० संघ येणार असुन १२ सप्टेंबरला ग्रामपंचायत हॉल मिरजोळे येथे होणार आहे. जिल्हा परिषद पावस गटात २२ संघ सहभागी झाले असुन १३ सप्टेंबरला मातोश्री मंगल कार्यालय, पावस-पूर्णगड रोड, मेर्वी येथे होईल. हरचिरी गटात २२ संघ सहभागी झाले असुन १४ सप्टेंबरला स्वामी समर्थ हॉल, नाचणे, हातखंबामध्ये ३२ संघ सहभागी होते हा कार्यक्रम १५ रोजी श्रीमंगल कार्यालय, पाली येथे होणार आहे.
सदर मंगळागौर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना रत्नागिरी तालुका महिला आघाडीच्या प्रमुख श्रीम.कांचन नागवेकर आणि शिवसेना तालुका महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख ज्योती मयेकर, स्मिता भिवंदे, दाक्षायणी शिवगण तसेच विभाग प्रमुख अपर्णा बोरकर, स्वरा देसाई, मेघना पाष्टे, संस्कृती पाचकुडे, साक्षी कुमठेकर, ऐश्वर्या विचारे, शुभांगी पड्ये, प्रज्ञा शिगवण, विद्या बोंबले रिया साळवी आदी पदाधिकारी मेहनत घेत आहेत.